महाराष्ट्रातील मतदारांना आता मतत्रिकेचाही पर्याय?

मुंबई: ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या मतदानाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कामाला लागले आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा पर्याय असावा म्हणून पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील मतदारांना विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतपत्रिकेचा पर्याय मिळावा म्हणून महाराष्‍ट्र विधानमंडळाने कायदा तयार करावा, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिल्या आहेत.
नागपूरचे प्रदीप महादेवराव उके यांनी या संदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदन दिले आहे. त्यासंदर्भात आज 02 फेब्रुवारी रोजी विधानभवन, मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयचे सचिव राजेंद्र भागवत, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग आणि राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिव भूपेंद्र गुरव आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here