चंद्रपूर २१ जानेवारी – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित सायकल मॅराथॉनला शुक्रवार 22 जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता सुरवात होणार असुन गांधी चौक ते प्रियदर्शिनी चौक ते गांधी चौक असा मॅराथॉनचा प्रवास असणार आहे. मनपाने नोंदणीसाठी दिलेल्या https://qrgo.page.link/WYPAV या लिंक वर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी नोंदणी केली असुन प्रदूषणमुक्त चंद्रपूर करण्यास उत्साह दर्शविला आहे.
राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या माझी वसुंधरा 2021 कार्यक्रम अंतर्गत प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण पाऊले उचलण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणुन सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
माझी वसुंधरा अभियान दि २ ऑक्टोबर २०२० ते दिनांक ३१ मार्च २०२१ या कालावधीत राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातुन लागु केले असुन प्रत्येकाच्या जिवनाशी निगमित, निर्सगाशी संबंधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारीत शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्याकरीता हे अभियान सुरु केले असुन या अभियान कालावधीत पंचतत्वाला व मानवी जीवनाला सहकार्य होण्याच्या हेतुने प्रत्येक नागरीकांनी सायकलचा (यंत्र विरहित) वापर अधिकाधिक करावा व सायकल वापराची व्याप्ती वाढावी या दृष्टीने सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
या सायकल मॅरेथॉनमधे अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन वायु प्रदुषण कमी करण्यास हातभार लावण्याचे आवाहन महापौर सौ. राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.