चंद्रपूर, दि. 19 जानेवारी : शहरातील जिल्हा परिषदेच्या ज्युबिली हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीचे निमित्याने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम नुकताचा आयोजित करण्यात आला होता.
या शाळेतून घडलेल्या माजी विद्यार्थ्याच्या सहकार्यातून तसेच माजी शिक्षक वा कार्यरत शिक्षक यांच्या सहकार्यातून सत्र २०२० मध्ये बोर्डाच्या परिक्षेत आणि प्रत्येक वर्गात प्रथम येणाऱ्या आणि विषयानुसार सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला.
सदर कार्यक्रमात कु. वैभवी चिडे, दिपमाला रायपूरे, विनित पिदुरकर, प्रणय नवघरे, जागृती चांदेकर, समायरा खान, गौरव शंभरकर, प्रणय पेटकर, रुत्विक उराडे, मेहूलकुमार तोकलवार, देवानंद भेंडारे आणि अन्य विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी जयंत मामीडवार तसेच शाळेचे प्राचार्य रविंद्र काळबांडे, सेवानिवृत्त शिक्षक प्रेमदास रामटेके, माजी विद्यार्थी अजय वैरागडे, सुदीप रोडे, प्रशांत जोशी तसेच शिक्षकगण सुजाता वाघमारे, मोरेश्वर बारसागडे यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले आणि भावी यशासाठी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजनासाठी, मंजुषा मोरे, पुष्पा कोटेवार, हेमावती धनेवार, पुनम मुडेवार, रविंद्र निमकर, शैलेश बरडे, अंबादास सुरपाम, अशोक किन्नाके, शिरीष बोंडे यांनी सहकार्य केले असल्याचे प्राचार्य रविंद्र काळबांडे यांनी कळविले आहे.