नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी दिला पदाचा राजीनामा

नागपूर, 21 डिसेंबर : शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपला सपाटून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्याचे परिणाम अजूनही भाजपमध्ये दिसून येत आहे. होमग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. महापौर संदीप जोशी यांनी आपल्या महापौरपदाचा राजीनामा दिला असल्याची बातमी पुढे येत आहे.
नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी आज महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. संदीप जोशी यांनी मनपा आयुक्तांकडे आपल्या महापौरपदाचा राजीनामा सोपविला आहे. संदीप जोशी हे पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिले होते. पण, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी संदीप जोशी यांचा पराभव केला होता. विशेष म्हणजे, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा बालेकिल्ला होता.संदीप जोशी यांच्या राजीनाम्यानंतर आता दयाशंकर तिवारी यांना नागपुरच्या महापौर पदाची जवाबदारी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here