चंद्रपूर, दि. 16 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 98 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 100 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधीताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 21 हजार 557 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 20 हजार 448 झाली आहे. सध्या 770 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 62 हजार 142 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 38 हजार 560 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये नागभीड तालुक्यातील 60 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 339 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 312, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 100 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 49, चंद्रपूर तालुक्यातील तीन, बल्लारपुर तीन, भद्रावती 11, ब्रम्हपुरी चार, नागभीड एक, सिंदेवाही चार, मुल आठ, सावली एक, राजुरा पाच, चिमुर चार, वरोरा पाच व कोरपना येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.