खा.शरदचंद्र पवार यांच्या व्हर्चुअल रॅलीला चंद्रपूर शहर राकाँ कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चंद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्य मुंबई येथून प्रसारित केल्या गेलेल्या व्हर्चुअल रॅलीचे नियोजन चंद्रपूर येथील बुरडकर सभागृह येथे सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत आयोजित करण्यात आले .कार्यक्रम यशस्वी करण्या करिता चंद्रपूर शहरातील विविध प्रभागात मिटिंग घेऊन व्हर्चुअल रॅलीचे महत्व कार्यकर्त्याना समजवून सांगण्यात आले. त्याचाच परिणाम आज दिनांक 12 डिसेंबर रोजी बुरडकर सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पवार साहेबावर प्रेम करणाऱ्यांनी उपस्थित राहून श्री.पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वर्चुअल रॅली च्या माध्यमातून पक्षातील जेष्ठ नेत्यांनी पवार साहेबा बद्दल त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. चंद्रपूर शहरातील युवक, युवती, पुरुष व महिलांनी मोठ्या संख्येत या कार्यक्रमात सहभागी होऊन शरदचंद्र पवार यांच्या प्रति आपले प्रेम व्यक्त केले.पवारांच्या मार्गदर्शनाने कार्यकर्त्याचे मनोबल उंचावले असून समाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतांना भविष्यात त्याचा उपयोग पडेल यात शंका नाही. ह्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब वासाडे, चंद्रपूर चे निरीक्षक प्रवीण कुंटे पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य,राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, शहर महिला अध्यक्ष ज्योती रंगारी, शहर महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे, शहर युवक अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, ज्येष्ठ नेते दीपक जयस्वाल, महिला जिल्हाध्यक्ष बेबी ताई उईके, शरद पवार विचारमंच अध्यक्ष निमेश मानकर, विद्यार्थी अध्यक्ष राम इंगळे, अल्पसंख्यांक अध्यक्ष नौशाद सिद्दिकी, किसान सेल उपाध्यक्ष अब्दुल एजाज, ओबीसी कार्याध्यक्ष विपीन झाडे, चेतन धोपटे, अभिनव देशपांडे, दीपक गोरडवर, मेघा रामगुंडे,डी. के. आरिकर, प्रियदर्शन इंगळे, संजय खेवले, मुन्ना तेमबुरकर, प्रज्ञा पाटील, धनंजय दानव, पूजा शेरकी, रेखा जाधव, मंगला आखरे, तराणे,भोयर,हर्षवर्धन पिपरे, सुनील दहेगावकर, रमेश दुर्योधन, निलेश उपरे, किशन झाडे, प्रवीण जुमडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला आघाडी, युवक,विद्यार्थी व राष्ट्रवादीच्या प्रत्येक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here