अन्न व औषध प्रशासनातर्फे 8 लाखाचा प्रतिबंधीत पानमसाला जप्त

चंद्रपूर, दि. 4 डिसेंबर : अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील विशेष पथकाद्वारे 8 लाख 25 हजार 800 रुपये किंमतीचा प्रतिबंधित पानमसाला जप्त करुन ताब्यात घेतला आहे. यासोबतच 1 एप्रिल 2020 ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत एकुण 36 पेढयांवर कारवाई घेवून किं. रु. 58 लाख 48 हजार 388 चा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
विशेष पथकाचे नागपूर विभाग  पथक प्रमुख, श्री. नि.दि.मोहिते, सहाय्यक आयुक्त अन्न व चंद्रपूर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी , श्री .अ. या. सोनटक्के ,श्री जी, टी. सातकर व श्री. प्र.अ उमप यांनी दिनांक 03/12 /2020 रोजीवसीम अख्तर झिमरी यांचे गोडाऊन प्लॉट नं. ई-69, दाताळा एमआयडीसी, चंद्रपूर यांचेकडून रजनीगंधा पान मसाला 129.6 गॅ., 22 नग, वजन 2.85,किंमत रु. 11 हजार 880, विमल पान मसाला 99 गॅ., 38 नग, वजन 3.76, किंमत रु.4 हजार 560, मजा हुक्का शिशा तंबाखु 200 गॅ. 1072 नग, वजन 214.4, किंमत 80 हजार 9360 असा एकूण  8 लाख 25 हजार 800 किंमतीचा साठा ताब्यात घेतलेला आहे. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन, पडोली येथे प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here