पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते प्रवेश
चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकारच्या कामावर सामान्य जनता समाधानी आहे. मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाच्या स्वागत करण्यात येत आहे. सुनील पाटील व शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला.
यावेळी चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रामू तिवारी, चंद्रपूर ग्रामीण काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी आमदार देवरावजी भांडेकर, बाजार समिती अध्यक्ष दिनेशजी चोखारे, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय यांची उपस्थिती होती. यावेळी सुनील पाटील यांच्यासोबत विशाल कातकर, रजनीकांत मुंडे, प्रशांत कातकर, नितेश वाडगुरे, हर्शल रामटेके, कैलास रायपुरे, नितीन भालेराव, ऋतुराज सोनटक्के, प्रीतम हस्ते, बाबुराव बोटरे, सचिन मोलपल्लीवार, विनोद शींदे, विनेश अवतरे, शैलेश बोरकर, आकाश कोडापे, शुभम गोवर्धन, आशिष पैठणकर, विष्णू मोटकरी, विराट काळे, पंकज टोल, नंदकिशोर पटले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला.
येत्या काळात काँग्रेसच्या ध्येय धोरणावर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे विचार शेवटच्या वर्गापर्यंत पोहचविण्याचे काम करणार असल्याचे सुनील पाटील यांनी सांगितले. पुढे देखील मोठ्या प्रमाणात नेते, कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश घेतील असा विश्वास चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रामू तिवारी यांनी व्यक्त केला.