हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ.
चंद्रपूर,दि. 27 नोव्हेबर : चंद्रपूर महानगर पालीकेचे सेवानिवृत्त कर्मचारी तथा कुटुंबनिवृत्तीधारक यांना पेन्शनकरिता दरवर्षी माहे नोव्हेंबर महिन्यात हयात असल्याचे प्रमाणपत्र कार्यालयात सादर करावे लागते. आतापर्यंत 758 सेवानिवृत्त कर्मचारी तथा कुटुंबनिवृत्तीधारकांपैकी 588 पेन्शनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर केलेले आहे. उर्वरीत 170 कर्मचाऱ्यांचे हयातीचे प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही.
सद्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव सुरु असल्यामुळे बरेचशे सेवानिवृत्त कर्मचारी तथा कुटुंबनिवृत्तीधारक हे बाहेरगावी अडकुन असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच काहीची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना हयातीचे प्रमाणपत्र कार्यालयात सादर करण्यास विलंब होऊ शकतो. करिता महाराष्ट्र शासनाचे 8 ऑक्टोबर 2020 चे परिपत्रकान्वये निवृत्ती वेतन धारकांना तसेच ज्यांचे वय 1 ऑक्टोबर 2020 रोजी 80 वर्ष पुर्ण होत आहे, अशा निवृत्तीवेतन धारकांना 31 डिसेबर 2020 पावेतो हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
तरी चंद्रपूर शहर महानगरपालिका, येथील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी व कुटुंबनिवृत्तीधारक यांनी सदर हयातीचा दाखला भारतीय स्टेट बँक मुख्य शाखा चंद्रपुर येथुन प्रमाणित करुन लेखा विभागात किंवा ई-मेल आयडी cafo.cmc@gmail.com वर दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत सादर करावा, असे असे आवाहन महानगरपालिकेवे मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार यांनी कळविले आहे.