ओबीसी जनगणना मोर्चाला पाठिंबा-प्रवीण खोब्रागडे

चंद्रपूर:अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने आज ओबीसी जनगणना समितीच्या प्रतिनिधींशी भेट घेत रिपब्लिकन नेते प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांचा मार्गदर्शनात २६ नोव्हेंबर २०२० रोजी चंद्रपूर येथे होत असलेल्या विशाल मोर्चायला पाठिंबा ओबीसी मोर्चाचे संयोजक डॉ समीर कदम,मा.सतीश मालेकर याना भेटून जाहीर पाठींबा दिला व सर्व समाज बांधवांना घेऊन मोर्चात सहभागी होणार असल्याचे अभिवचन दिले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत ओबीसी प्रवर्गाला 340 कलम अंतर्गत अधिकार बहाल केले व त्याचाच आधार घेऊन मंडळ आयोगाने ओबीसी प्रवर्गाला त्यांना अनेक क्षेत्रात अधिकार दिले.या सर्व घटनांचा आधार घेत चंद्रपूर येथील होऊ घातलेल्या ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना २०२१ च्या जनगणनेत व्हवी ही रास्त मागणी भारतीय संविधानाला अनुसरून असल्यामुळे आणि प्रत्येक भारतीयाला त्याचा हक्क व अधिकार बाबत आवाज उठविताना अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष त्या समूहाच्या बाजूने खंबीरपणे सोबत असणार आहे आणि याच भूमिकेतून ओबीसी विशाल मोर्चाला पाठिंबा जाहीर करत आहोत या प्रतिनिधी मंडळात जिल्हाअध्यक्ष प्रेमदास बोरकर,केंद्रीय सदस्य प्रतीक डोरलीकर, रिपब्लिकन स्तुडेंट फेडरेशनचे अध्यक्ष राजस खोब्रागड,मुन्नाभाऊ आवळे,शुभम शेंडे, किशोर भगत,सुधीर ढोरे,तन्मय चन्ने,प्रजोत बोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here