वरोरा, चिमुर,ब्रम्हपुरी व गडचांदूर येथील नागरिकांनी लाभ घ्यावा
चंद्रपूर, दि. 18 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी व गडचांदूर या तालुक्याच्या ठिकाणी शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्क्या अनुज्ञप्ती, खाजगी संवर्गातील वाहनाची नोंदणी इत्यादी कामांकरिता माहे नोंव्हेंबर महिन्यातील एक दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
परिवहन विभागाच्या कार्यक्रमानुसार आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथे दिनांक 24 नोव्हेंबर, शासकीय विश्रामगृह, चिमुर येथे 25 नोव्हेंबर, एन.एच. महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे दिनांक 26 नोंव्हेंबर तर शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर येथे दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
इच्छुक नागरिकांनी parivahan.gov.in या संकेतस्थळावर सारथी सॉफ्टवेअर मध्ये स्लॉट बुकींक करून अपॉईंन्टमेंन्ट घ्यावी. अपॉईंन्टमेंन्ट नसल्यास ऑनलाईन चाचणी देता येणार नाही. तरी या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक जाधव यांनी केले आहे.