चंद्रपूर : वेकोलीच्या दुर्गापूर रयतवारी कॉलरी -3 मध्ये ट्रामर पदावर कार्यरत श्री. सुरेश महादेव उगे यांना यावर्षीचा उत्कृष्ट कामगार पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. वेकोलीच्या 46व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘श्रमोत्सव 2020’ या कार्यक्रमात वेकोली चे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर यांचे हस्ते श्री. उगे यांना आभासी पध्दतीने सन्मानित करण्यात आले.
आपले नियोजित कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडणा-या समर्पित कर्मचा-यांना दरवर्षी हा पुरस्कार वेकोली प्रदान करते.यावर्षी चंद्रपूर एरिया वेकोली अंतर्गत सात भुमिगत व खुल्या खाणीतील विविध पदावरील एकुण 55 कर्मचा-यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
श्री सुरेश उगे यांनी आजपर्यंतच्या आपल्या सेवाकाळात नियोजित कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडले. त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.