राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी घेतली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट
नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही: ना. जयंत पाटिल यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
चंद्रपूर:चंद्रपूर मनपा च्या चुकी मूळे चंद्रपूर शहरातील बहुतांश भाग हा पूरग्रस्त घोषित करण्यात आला आणि ह्याच्या त्रास सर्व सामान्य जनतेला भोगावा लागत होता. पूरग्रस्त घोषित केल्यामुळे रहिवाशांना घर बांधण्या साठी मनपा नाहरकत प्रमाणपत्र देत नाही आणि त्यांना घर बांधणी साठी लोन सुध्दा मिळत नाही. अश्या जनतेच्या समस्या घेऊन चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड आणि संपूर्ण शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गेल्या सहा महिन्यापासून संपूर्ण परिसरात जनजागृती करून 3500 रहिवाशांची स्वाक्षरी ह्या अभियाना अंतर्गत घेण्यात आली आणि संपूर्ण पूरग्रस्त भागात कॉर्नर मिटिंग लावून त्या त्या परिसरातील रहिवाश्यावर मनपा ने आपल्या वर कशा प्रकारे अन्याय केला ह्या विषयी माहिती देऊन त्यांना जागृत करण्यात आले. आणि हे सर्व कागदपत्र आणि 3500च्या वर रहिवाशांचे स्वाक्षरी असलेले पत्र आणि निवेदन राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील ह्यांना देण्यात आली. राजीव कक्कड यांनी ना.जयंत पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन या विषयाची सम्पूर्ण माहिती दिली. ह्या सर्व बाबी ऐकून ना.जयंत पाटील ह्यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव श्री लोकेशचंद्र साहेबांना ह्या बद्दल सकारात्मक सूचना केल्या आणि चंद्रपूर महानगर पालिका कडून प्रस्ताव आल्यावर जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या पूरग्रस्त भागांच्या विषया वर तोडगा काढल्या जाईल असे आश्वासन देण्यात आले.
ह्या शिष्टमंडळा मध्ये विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, रामप्यारे शर्मा, सुनील मांदळे आणि मुडेवार उपस्थित होते.