राज्याने त्वरित निर्णय बदलावा – पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर
चंद्रपूर,22 ऑक्टोबर:महाराष्ट्र सरकारने राज्यात चौकशी करण्यास सीबीआय ला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय मंत्राीमंडळात घेतल्याचे कळते. आपल्या देशाच्या संघीय ढाच्याला खिळखिळा करणारा निर्णय असल्याचे मत पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.
सीबीआई नी राज्यांमध्ये सरळ चौकशी करण्याचा अधिकार विविध राज्यांच्या सहमती ने(General Consent) दिल्ली विशेष पोलिस अन्वेषण(DSPE) अधिनियम अंतर्गत देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र हे कुशल राज्य असून पुरोगामी विचारसरणीचे राज्य आहे. राज्य सरकारने असा निर्णय घेऊन देशात आपले हसे करून घेतले आहे. महाराष्ट्र सरकार दिशाहीन बनलेले आहे अशा भुमिकेमुळे राज्यातील भ्रष्टाचार संपवावा ही प्रामाणिकता राज्य सरकारची दिसत नाही. या निर्णयाने भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळेल ही भावना व्यक्त करून राज्याने त्वरीत निर्णय बदलावा अशी मागणी करत सरकारच्या या भुमिकेची अहीर यांनी निंदा केली.