पुरातत्व विभागाच्या आदेशाला स्थगिती देऊन नियम बदलविण्याची मागणी

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची मागणी    चंद्रपूर:चंद्रपूर शहरात वर्षानुवर्षे पासून किल्ल्या लगत (परकोट) घरे आहेत. या परकोटाला लागून बांधकाम करण्यास नगर प्रशासन परवानगी देत आलेली आहे. वरिष्ठ संरक्षण सहाय्यक , भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, उपमंडळ चंद्रपूर यांनी दिलेल्या सक्तीच्या नोटिसीनुसार परकोटापासून १०० मीटर पर्यंत बांधकाम करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे नवीन बांधकामांना महानगरपालिका प्रशासनाकडून परवानगी देणे बंद आहे. पुरातत्व विभागाच्या आदेशाला स्थगिती देऊन नियम बदलविण्याची मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार ) मा. श्री प्रल्हाद पटेल यांची नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन केली. यावर केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर देऊन कॅबिनेट मध्ये विषय ठेवण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here