मागील 24 तासात 247 कोरोनामुक्त

चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर: जिल्ह्यात गत 24 तासात 247 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 195 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहराच्या इंदिरानगर भागातील 60 वर्षीय व 65 वर्षीय पुरुष, स्वावलंबी नगर येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 208 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 197, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ पाच आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 195 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 13 हजार 807 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात  247  बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 10 हजार 701 झाली आहे.  सध्या 2 हजार 898 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्हयात आतापर्यंत 1 लाख 10 हजार 955 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 95 हजार 669 नमुने निगेटीव्ह आले आहे.  नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टंसिंग पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 195 बाधितांमध्ये  113 पुरुष व 82 महिला आहेत. यात  चंद्रपूर शहर व परीसरातील 76, पोंभुर्णा तालुक्यातील 15, बल्लारपूर तालुक्यातील सहा, चिमूर तालुक्यातील पाच, मुल तालुक्यातील 10, कोरपना तालुक्यातील 10, ब्रह्मपुरी तालुक्यातील सहा,  वरोरा तालुक्यातील आठ,भद्रावती तालुक्यातील 20, सावली तालुक्यातील एक,  सिंदेवाही तालुक्यातील 10, राजुरा तालुक्यातील 13, गोंडपिपरी तालुक्यातील तीन, नागभिड तालुक्यातील 9,  गडचिरोली येथील दोन तर वणी-यवतमाळ येथील एक असे एकूण 195 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील व परिसरातील  बियानी नगर तुकुम, एकोरी वार्ड, ओम नगर, भिवापुर, बापट नगर, बालाजी वार्ड, कृष्णा नगर, विजयनगर, बंगाली कॅम्प परिसर, आंबेडकर नगर बाबुपेठ, इंदिरानगर, घुग्घुस, गंज वार्ड, नगीनाबाग, विठ्ठल मंदिर वार्ड, शिवाजीनगर, रामनगर, संजय नगर, सम्राट नगर, ऊर्जानगर, समाधी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील झाकीर हुसेन वार्ड, विसापूर, बालाजी वार्ड, गौरक्षण वार्ड, विवेकानंद वार्ड, किल्ला वार्ड भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील मालवीय वार्ड, आशीर्वाद वार्ड, अभ्यंकर वार्ड, बोर्डा, राजीव गांधी वार्ड, माढेळी परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर, मेंढा, पटेल नगर, गांधिनगर, परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील श्रीराम नगर, गुरु नगर, संताजी नगर, कन्नमवार वार्ड, नवीन सुमठाणा, पिपरबोडी, खापरी वार्ड, पांडव वार्ड, डिफेन्स चांदा परिसर, मासळ परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.
राजुरा तालुक्यातील सास्ती, विहीरगाव, अमराई वार्ड, टिचर कॉलनी परिसर, देशपांडे वाडी भागातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील नेताजी वार्ड, नेरी भागातून बाधित ठरले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील टेकाडी, चारगाव, नवरगाव, देलनवाडी,परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील राम मंदिर परिसर, बाजार चौक, सावरगाव, बाळापुर, तळोधी भागातून बाधित पुढे आले आहे.
मुल तालुक्यातील गडीसुर्ला, भागातून बाधीत ठरले आहे. पोंभूर्णा तालुक्यातील शास्त्रीनगर, डोंगर हळदी, शिवाजी चौक, आष्टा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली,लाठी भागातून बाधित पुढे आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here