भाजपाची मागणी-आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
आ.मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपाचे आंदोलन
चंद्रपूर:राज्याच्या महिला व बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावल्या नंतर ही त्यांनी राजीनामा दिला नाही.आता हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा,त्यांना बडतर्फ करावे अशी मुख्य मागणी घेऊन भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने सोमवार(१९ऑक्टोबर)ला जटपूरा गेट यथे आंदोलन करण्यात आले.
आ.सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे,जिल्हाध्यक्ष (ग्रा)देवराव भोंगळे,भजयुमो जिल्हाध्यक्ष(ग्रा)ब्रिजभूषण पाझारे, जिल्हाध्यक्ष(श)विशाल निंबाळकर यांनी केले.
यावेळी महापौर राखी कांचर्लावार,भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे,भाजपा नेते प्रकाश धारणे,राजेंद्र अडपेवार,प्रमोद शास्त्रकार,नगरसेविका शितल गुरनुले, सविता कांबळे, वनिता डुकरे ,शीला चव्हाण ,माया उईके,छबु वैरागडे,शीतल आत्राम, नगरसेवक सोपान वायकर ,सतीश घोनमोडे, वसंता देशमुख,रवी आसवानी,संदीप आवारी, प्रदीप किरमे, विठ्ठल डुकरे,प्रशांत विघ्नेश्वर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ गुलवाडे म्हणाले,सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न ना.यशोमती ठाकूर यांनी चालवला आहे. स्वतःच्या दुष्कृत्याला लपविण्यासाठी असा केविलवाणा प्रयत्न करण्यापेक्षा नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आमदारकीचा व मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे.
यशोमती ताईंना अमरावती जिल्हा न्यायालयाने दोषी ठरविले आहे.त्यांनी जे काही दुष्कृत्य केले,तो म्हणजे निव्वळ आणि निव्वळ सत्तेचा माज आहे.त्यांनी लगेच राजीनामा दयावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा तसे न झाल्यास भारतीय जनता पार्टी हे आंदोलन अधिक तीव्र करेल असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी बोलताना देवराव भोंगळे म्हणाले,२५ मार्च २०१२ला राज्यात काँग्रेसचे शासन असताना घडलेला हा प्रसंग आहे. वाहतुकीसाठी बंद असलेल्या रस्त्यावर म्हणजे वनवे वर आपली कार अडवली म्हणून उल्हास रौराळे या पोलिसाला त्यांनी मारहाण केली होती. ड्युटीवर असलेल्या वर्दीधारी पोलिसाला मारहाण करण्याच्या प्रकरणी यशोमती ताईंना भाजपाने नव्हे तर न्यायालयाने दोषी ठरवले आहे. भाजपाच्या नेत्यांवर तोंडसुख घेताना त्या वारंवार मारण्याची भाषा बोलतात. संस्कार आडवे येतात नाहीतर मारले असते असे उदगारही त्यांनी नुकतेच काढले होते. एक वेळ राजकीय आंदोलनात भावनेच्या भरात हातून गुन्हा घडतो ते ही आपण समजू शकतो पण कर्तव्याची चाड बाळगणार्या व आग्रही पोलिसांच्या थोबाडीत हाणणे कितपत योग्य आहे…?याचा विचार महाविकास आघाडी सरकार ने करावा. एरवी संविधानाचा बाऊ करून राजकारण करणाऱ्या यशोमती ताईंना पोलिसाला मारतांना संविधानाचा विसर पडला होता का…? असा प्रश्न उपस्थित करून, आमदारकीची व मंत्रिपदाची शपथ घेताना संविधानाचे संरक्षण करण्याची जी जबाबदारी त्यांनी स्वीकारली याकडे त्यांनी लक्ष वेधले. ना.यशोमती ताई यांनी संपूर्ण पोलीस खात्याची व राज्यातील जनतेची बिनशर्त माफी मागत राजीनामा दयावा अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.जिल्हाधिकारी मार्फत,ना. यशोमती ठाकूर यांच्या राजीनामा संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पाठविण्यात आले.
आंदोलनात भाजयुमोचे सुरज पेदूलवार,प्रज्वलंत कडू, कृष्णा चंदावार, राकेश बोमनवार ,बंडू गौरकर, संगीता खेडकर, महेश कोलावार, कुणाल गुंडावार ,यश बांगडे, प्रवीण उरकुडे, सुनील डोंगरे,श्रीकांत येलपुलवार,आदित्य डवरे, नंदकिशोर बाबुलकर ,सत्यम गाणार, प्रमोद शिरसागर, मनोरंजन राय, सलमान पठाण, आतिश डवरे, आकाश ठुसे, रुपेश केळझरकर, भाणेश मातंगी,अमित गौरकार, संजय निकोडे यांनी सहभाग घेतला.