चंद्रपूर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांना सातव्‍या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत

चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्‍या आस्‍थापनेवरील अधिकारी व कर्मचा-यांना सातव्‍या वेतन आयोगाच्‍या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्‍यास मंजूरी देण्‍यात आली आहे. राज्‍य शासनाच्‍या नगरविकास विभागाने 14 ऑक्‍टोबर 2020 च्‍या पत्रान्‍वये याबाबत महानगरपालिकेच्‍या आयुक्‍तांना सूचित केले आहे. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात सातत्‍याने केलेल्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्‍या आस्‍थापनेवरील अधिकारी व कर्मचा-यांना राज्‍य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे सातव्‍या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्‍याची बाब शासनाच्‍या विचाराधीन होती. यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्‍याने शासनाशी पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला आहे. त्‍यांच्‍या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले आहे.

महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांची जिव्‍हाळयाची मागणी पूर्ण केल्‍याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांचे महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, मनपातील भाजपाचे गटनेते वसंत देशमुख, माजी महापौर सौ. अंजली घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, विशाल निंबाळकर, रामपाल सिंह, राजीव गोलीवार, राजेंद्र अडपेवार, संजय कंचर्लावार, रवि आसवानी, सुभाष कासनगोट्टूवार, संदीप आवारी, देवानंद वाढई, अॅड. राहूल घोटेकर,सौ. छबू वैरागडे, सौ. आशा आबोजवार, सौ. माया उईके, सौ. शिला चव्‍हाण, सौ. शितल गुरनुले, सौ. वनिता डुकरे, सोपान वायकर, सौ. वंदना जांभुळकर, अंकुश सावसाकडे, सौ. चंद्रकला सोयाम, सौ. जयश्री जुमडे, सौ. पुष्‍पा उराडे, सौ. शितल आत्राम, सौ. सरीता कांबळे, सौ. वंदना तिखे, प्रशांत चौधरी, कु. शितल कुळमेथे, सौ. अनुराधा हजारे, सतिश घोनमोडे, सौ. खुशबु चौधरी, सौ. संगीता खांडेकर, स्‍वामी कनकम, सौ. ज्‍योती गेडाम, सौ. कल्‍पना बगुलकर, सौ. निलम आक्‍केवार यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here