राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
चंद्रपूरात भाजपचे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन
चंद्रपूर: हे सरकार कुंभकर्णी झोपेत आहे. राज्यात दिवसाढवळ्या आई बहिणींवर अत्याचार होत आहेत पण सरकारला काहीही देणेघेणे नाही. आरोपी मोकाट फिरत आहेत.महिला राज्यात असुरक्षित आहेत. महिलांवरील अत्याचार थाम्बवायचे असतील तर,दिशा कायदा लागू करण्याची आवश्यकता आहे.या बेफिकीर सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली असून महिलांवर होणारे अत्याचार रोखले नाही तर आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा महापौर सौ राखी कंचर्लावार यांनी यांनी दिला.
दि. 12 नोव्हेंबर रोजी भाजपा चंद्रपूर महानगर तसेच भाजप महिलाआघाडी चंद्रपूरच्या वतीने महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शाई फासून , बांगड्या भरून, चपलांचा मार देत त्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सौ वनिता कानडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संध्या गुरनुले , महापौर सौ राखी कंचर्लावार ,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहुल पावडे ,महानगर भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर , भाजप नेते प्रमोद कडू,राजेंद्र गांधी,सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, प्रशांत विघ्नेश्वर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी सौ वनिता कानडे , सौ संध्या गुरनुले , मंगेश गुलवाडे यांनी सुद्धा आपल्या भाषणातुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली.संचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन माया मांदाडे यांनी केले.आंदोलनात नगरसेवक चंद्रकला सोयाम ,ज्योती गेडाम ,संगिता खांडेकर ,कल्पना बागुलकर ,छबु वैरागडे, शितल आत्राम ,वनिता डुकरे ,शितल गुरनुले, माया उईके, शीला चव्हाण, शितल कुळमेथे, पुष्पा उराडे आदी महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.
आंदोलनानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.