अधिकारी, लोकप्रतिनिधींची डोळेझाक
चंद्रपूर:आज शुक्रवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सावरकर चौक ते मुल रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका सायकल स्वाराला ट्रकने चिघळले. यामध्ये त्यात सायकलस्वाराचा हात निकामी झाला, रामनगर पोलीस चौकी ते मूल रोड जाणारा हा रस्ता अत्यंत बिकट आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी या रोडची अवस्था आहे, संबंधित विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. त्यामध्ये निर्दोष लोकांचे अपघात होत असतात. सुदैवाने काही बचावतात तर काहींना यमलोकी जावे लागते. मागील अनेक वर्षापासून हा रोड असाच पडला आहे. कामकाज, डागडुजी हे कारण देऊन वेळ ढकलल्या जात आहे. पण या रस्त्यावर होणारे अपघाताला जबाबदार कोण ? यावर कधीही गांभीर्याने घेतल्या गेली नाही. शुक्रवार दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन च्या जवळपास एका सायकल स्वाराला याच रोडवर अपघातात हात गमवाला लावला, सुदैवाने मोठी दुर्घटना याठिकाणी टळली असली तरी या अपघाताला जबाबदार विभाग मात्र “निद्रेमध्ये” आहे. वाहतूक विभाग कार्यालयापासून तर मूल रोडपर्यंत मुख्य असणाऱ्या चंद्रपूर शहरातील या रस्त्याची मागील अनेक वर्षापासून बिकट अवस्था आहे. हा रस्ता आजघडीला “मौत का कुंआ” आहे. या रस्त्याचे कंत्राट असलेले कंत्राटदार यांच्यावर कोणताच निर्बंध किंवा दबाव संबंधित विभागाच्या नाही असे स्पष्ट होते. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यांची जबाबदारी ज्या अधिकाऱ्याकडे आहे ते अधिकारी संवेदना मृत पावलेले आहे, असे म्हणणे गैर होणार नाही. कारण याच रस्त्यावर त्यांचे रहाणे आहे. या रस्त्यावरील दूर्व्यवस्था त्यांना दिसत नाही, याचाच अर्थ ते मुर्दा अवस्थेत आहेत, अशी स्थिती आहे. या रस्त्यावरील दुरावस्थेसंबंधात आजपावेतो कोणतीही मोठी पाऊल उचलल्या गेले नाहीत. कंत्राटदाराची बाजू घेऊन हे अधिकारी नेहमीच बोलत असतात. यावरून या रस्त्याबाबत ते किती गंभीर आहेत, त्यांचा विभाग किती गंभीर आहे याचा अंदाज येऊ शकतो. छोटे-मोठे अपघात या रस्त्यावर नेहमीची बाब आहेत. या छोट्या-मोठ्या अपघातामुळे सामान्यांच्या दैनिक जीवनावर मोठा परिणाम होतो, आज झालेला अपघात त्याची प्रचिती आहे. अशा अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व याला गांभीर्याने घेण्यात यावे,अशी मागणी आता होऊ लागली आहे.