चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 8099 बाधितांना डिस्चार्ज

चंद्रपूर, दि. 7 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 166 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 हजार 472 झाली आहे. यापैकी 8 हजार 99 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 194 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासामध्ये दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये, छोटा नागपूर, चंद्रपुर येथील 70 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 6 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
तर, दुसरा मृत्यू सिंधी कॉलनी परिसर रामनगर, चंद्रपुर येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. तर, दुसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता. दोनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 179 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 170, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 65, पोंभुर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील 11, चिमूर तालुक्यातील 13, मुल तालुक्यातील 14, जिवती तालुक्यातील पाच, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच,  नागभीड तालुक्‍यातील सहा, वरोरा तालुक्यातील आठ ,भद्रावती तालुक्यातील 16, सावली तालुक्यातील पाच,  सिंदेवाही तालुक्यातील चार, राजुरा तालुक्यातील 10 तर नागपूर येथील एक असे एकूण 166 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील व परिसरातील दुर्गापुर, घुटकाळा वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, हॉस्पिटल वार्ड, प्रगती नगर, विद्यानगर, तुकूम, गिरणार चौक परिसर, भिवापूर वार्ड, इंदिरानगर, जल नगर वार्ड, बाबूपेठ, सरकार नगर, पठाणपुरा वार्ड, घुग्घुस, द्वारका नगरी, ओमकार नगर, हनुमान नगर,भाना पेठ वार्ड, घंटाचौकी, बोर्डा, बापट नगर भागातून बाधित पुढे आले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील रेल्वे वार्ड, विद्या नगर वार्ड, गौरक्षण वार्ड, साईबाबा वार्ड, बामणी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. राजुरा तालुक्यातील पंचशील वार्ड, बामणवाडा, सोमनाथपूर वार्ड, मानोली, कढोली, म्हाडा कॉलनी परिसर, जवाहर नगर, सास्ती,धोपटाळा भागातून बाधीत पुढे आले आहे.
वरोरा तालुक्यातील यात्रा वार्ड, आंबेडकर वार्ड, सलीम नगर, टेमुर्डा, गांधी वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील कहाली, चौगान, मालडोंगरी, विद्यानगर, परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.भद्रावती तालुक्यातील विस्लोन, जुना सुमठाणा, झिंगोजी वार्ड, सुरक्षा नगर, एकता नगर,किल्ला वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.
सावली तालुक्यातील अंतरगाव,व्याहाड भागातून बाधित ठरले आहे.सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही,भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील डोंगरगाव, पेंढरी, मोहाडी, वसुंधरा कॉलनी परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील मोटेंगाव, नेताजी वार्ड, टिचर कॉलनी परिसर, राजीव गांधी नगर, नेहरू वार्ड, गुरुदेव नगर  भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर एक, हेकाडी, राजोली, ताडाळा परिसरातून बाधित ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here