पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत घसरण कायम

24 तासात केवळ 92 नव्या बाधितांची नोंद  चंद्रपूर, दि. 5 ऑक्टोंबर : चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. तरीसुद्धा कोरोनाची साखळी पूर्णपणे खंडित व्हावी यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे. बाहेर पडताना तसेच सार्वजनिक ठिकाणी सदैव मास्कचा वापर करावा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात 92 बाधित पुढे आलेले असून एकूण बाधितांची संख्या आता 11 हजार 118 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 7 हजार 671 कोरोना बाधित उपचाराअंती बरे झालेले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3 हजार 273 आहे.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात सात बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, रामपूर, राजुरा येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 30 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
दुसरा मृत्यू नगीना बाग, चंद्रपुर येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 30  सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
तिसरा मृत्यू नेहरू नगर, चंद्रपुर येथील  57 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
चवथा मृत्यू हनुमान नगर, ब्रम्हपुरी येथील 52 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 1 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
पाचवा मृत्यू नगीना बाग, चंद्रपुर येथील 65 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 27 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
सहावा मृत्यू मुक्ती कॉलनी परिसर, चंद्रपुर येथील 78 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 4 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.
तर, सातवा मृत्यू विश्वकर्मा नगर, भद्रावती येथील 68 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 27 सप्टेंबरला कोलसिटी हॉस्पीटल, चंद्रपुर येथे भरती करण्यात आले होते. अनुक्रमे पहिल्या ते पाचव्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. सहाव्या बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाब, न्युमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे. सातव्या बाधिताला कोरोनासह उच्चरक्तदाब, न्युमोनियाचा आजार असल्याने  कोलसिटी हॉस्पीटल, चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 174 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 165, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधितांचा समावेश आहे.
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 62, बल्लारपूर तालुक्यातील दोन, मुल तालुक्यातील 11, कोरपना तालुक्यातील एक,  वरोरा तालुक्यातील तीन, भद्रावती तालुक्यातील आठ, सावली तालुक्यातील एक,  सिंदेवाही तालुक्यातील तीन, गडचिरोली येथील एक असे एकूण 92 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहर व परिसरातून स्नेह नगर, अंचलेश्वर वार्ड, रामनगर, आकाशवाणी रोड, एकोरी वार्ड, साईबाबा वार्ड, सिव्हिल लाईन, कोतवाली वार्ड, बाबुपेठ, स्वस्तिक नगर, श्याम नगर, सरकार नगर, तुकूम, महाकाली वार्ड, सिस्टर कॉलनी परीसर, बापट नगर, जीएमसी परिसर, बाजार वार्ड, लालपेठ कॉलनी परीसर, श्रीराम वार्ड, वृंदावन नगर, सावरकर नगर, गंजवार्ड, भाना पेठ वार्ड, इंदिरानगर, गांधी चौक, जगन्नाथ बाबा नगर, भिवापुर वॉर्ड, शिवाजीनगर, दाताळा रोड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील गांधी चौक भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर सहा, वार्ड नंबर 12, वार्ड नंबर 15, राजुरी परिसरातून बाधित ठरले आहे.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.भद्रावती तालुक्यातील झाडे प्लॉट परिसर, सुमठाणा परिसरातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव, नवरगाव भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here