आमदार जोरगेवार यांनी केला सरस्वती पुत्र प्रा. मदनराव धनकर यांचा सत्कार
विदर्भातील सरस्वती पुत्र म्हणून ज्यांना महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती व शिक्षण क्षेत्रात ओळखल्या जातं असे सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर चे उपाध्यक्ष पुरुषोत्तम उपाख्य मदनराव धनकर यांना नुकताच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली ने जिवन साधना गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रा. मदनराव धनकर यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला.
चंद्रपूर च्या साहित्य संस्कृती व शिक्षण क्षेत्रात मदनराव धनकर यांचे मोलाचे योगदान असून गोंडवाना विद्यापीठाने दिलेला हा पुरस्कार म्हणजे चंद्रपूर चा गौरव आहे. असे मत यावेळी जोरगेवार यांनी व्यक्त केले. चंद्रपूर जिल्ह्याचे शिक्षण, कला व साहित्य क्षेत्रात मोठे योगदान राहले आहे. त्यात प्रा. मदनराव धनकर यांचाही वाटा मोठा आहे. अनेक शैक्षणिक व साहित्यिक संस्थांना प्रा. मदनराव धनकर यांचे पाठबळ राहिले आहे. चंद्रपूरचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे अतिशय योग्य व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवळ करण्यात आली आहे. असे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले. यावेळी आ. जोरगेवार यांनी शाॅल, श्रीफळ व ग्रामगीता देऊन प्राचार्य मदनराव धनकर यांचा सत्कार केला. या प्रसंगी प्रा.पराग धनकर, प्रा. रक्षा धनकर, प्रा. डाॅ. पद्मरेखा धनकर , परीमल धनकर ,प्रा. शाम हेडाऊ आदींची उपस्थिती होती.