चंद्रपूर:कोरोनाच्या संकटकाळी सेवा देत कोविड योद्धाची भूमिका पार पाडत असलेल्या आशा वर्कर यांनी आज वाढीव मानधन देण्याच्या मागणीसाठी महानगर पालिकेत ठिय्या आंदोलन केले. रात्री 9 वाजेपर्यंत त्यांचे आंदोलन सुरूच होते. याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांना मिळताच त्यांनी महानगरपालिका गाठत मध्यस्ती केली. त्यानंतर आशा वर्कर यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. यावेळी महापौर राखी कंचर्लावार यांचीही उपस्थिती होती.
कोरोनाकाळापासूच आशा वर्कर यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे. जीवाची पर्वा न करता आशाताई प्रतिबंधीत क्षेत्रात आपले कर्त्यव्य चोक बजावत आहे. मात्र त्यांना अत्यंत अल्प मानधन दिल्या जात आहे. त्यामुळे या मानधनात वाढ करण्यात यावी अशी त्यांची जुनी मागणी आहे. त्यातच आता आशा वर्कर यांची कोरोना काळातील सेवा लक्षात घेता इतर महानगर पालिकांनी त्यांच्या मानधनात वाढ केली आहे. मात्र चंद्रपूर महानगर पालिका आशा वर्कर यांच्याप्रति उदासीन दिसत आहे. त्यामुळे मानधनात वाढ करण्यात यावी या मागणी करिता आज आशा वर्कर यांनी महानगरपालिकेत ठिया आंदोलन सुरू केले होते. रात्री उशिरा पर्यंत हे आंदोलन सुरूच होते. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलन स्थळ गाठून मध्यस्ती केली. यावेळी येथे उपस्थित महापौर राखी कांचर्लावार यांनी मानधन वाढीबाबत उद्या बैठक लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी हे आंदोलन स्थगित करण्याची विनंती आंदोलनकर्त्या आशाताईंना केली. या विनंतीला मान देत आशा वर्कर यांनी आपले आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे.