बुधवारी चंद्रपूरात 96 बाधितांची वाढ

चंद्रपूर,26 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1667 झाली आहे. गेल्या 24 तासात 96 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 1068 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 579 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 1068 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 17 सह एकूण 20 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. नागरिकांनी परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here