चंद्रपूर:जिल्ह्याचे मावळते जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांना जिल्हा माहिती कार्यालयातील मीडिया सेंटरच्या सभागृहात एका छोटेखानी कार्यक्रमात शनिवार २२ ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने निरोप देण्यात आला.प्रवीण टाके यांची नुकतीच नागपूर येथे बदली झाली आहे.
चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बंडूभाऊ लडके, सरचिटणीस सुनील तिवारी,उपाध्यक्ष वैभव पलीकुंडवार यांनी शॉल व श्रीफळ देऊन प्रवीण टाके यांचे सत्कार केले.यावेळी आठवण म्हणून चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची प्रतिमा त्यांना देण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करीत निरोप समारंभ पार पडला.प्रविण टाके यांनी माध्यमांशी सलोख्याचे संबंध ठेवून २४/७ ते नेहमीच मदतीकरीता व संवादाकरीता उपलब्ध झाले आहे. त्यांनी दिलेल्या सकारात्मक व वस्तुनिष्ठ माहिती व वृतामुळे कोरोनाच्या वर्तमान काळात पत्रकारांना,प्रशासनलाला नक्कीच मदत झाली.
यावेळी चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, जिल्हा माहिती कार्यालतील अधिकारी,कर्मचारी आदि उपस्थित होते.