यंदा गणेशोत्सव पारंपरिक, साधेपणाने आणि चौकटीत राहून साजरा करूया : आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर दि.२२ : चंद्रपूर, नागपूर, गडचिरोलीसह महाराष्ट्रात अतिशय उत्साहाने साजरा होणार सण म्हणजे गणेशोत्सव. गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठी महत्वाचा सण. हा सण दरवर्षी अतिशय उत्साहाने साजरा केला जातो मात्र नेहमी वाजत गाजत येणाऱ्या आणि तेवढ्याच धुमधडाक्यातील विसर्जन मिरवणुकीतून निरोप घेणाऱ्या गणरायाच्या उत्सवावरही यंदा करोनामुळे विघ्न आलं आहे त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने, साधेपणाने आणि चौकटीत राहून साजरा करूया, हे संकटमोचक विध्नहर्ता विश्वावरील कोरोनाचं विघ्न लवकरात …लवकर टळू दे अशी प्रार्थनाही गणरायाला आपण सर्वांनी करूया असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

श्री. वडेट्टीवार म्हणाले की, यंदा पाऊस आणि कोरोना या दोन आव्हानांविरुद्ध लढाई आहे. कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. राज्यात ‘मिशन बिगीन अगेन‘ करण्यात आले असले तरी आपण सगळ्यांनी यापुढील काळातही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनीच आरोग्याची काळजी घेत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करूया. तसेही आपल्या संस्कृतीमध्ये उत्सवाची संकल्पना ही निसर्गाशी जोडलेली आहे. निसर्गात उपलब्ध असलेल्या गोष्टींमधूनच, उत्सव साजरा करण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेत यंदाचा गणेशोत्सव चौकटीत राहून पारंपरिक, साधेपणाने व अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करूया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here