घुग्गुस(प्रतिनिधी) २१ ऑगस्ट:
नकोडा ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवार २० ऑगस्टला घुग्घुस पोलीस स्टेशन येथे सॅनिटाईजर मशीन लावण्यात आली.
कोरोना खबरदारी करीता सामाजिक बांधिलकी जोपासत नकोडा ग्रामपंचायतीच्या वतिने घुग्घुस पोलीस स्टेशन येथे सॅनिटाईजर मशिन लावण्यात आली.
यावेळी नकोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच तणुश्री बांदुरकर, उपसरपंच हनिफ मोहम्मद ,घुग्घुस यंग चांदा ब्रिगेडचे इमरान खान, सहायक पोलिस निरीक्षक विरसेन चहांदे, मनिषा जगताप व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.