चंद्रपूर ;- वेकोलि च्या पैनगंगा, निलजई – 2, निलजय साऊथ या खाणीत स्थानिक ट्रक चालक मालकांवर सतत अन्याय करण्यात येत आहे.
स्थानिकांना रोजगार देण्यात येत नाही.डिजलचे दर आकाशाला भिडलेले आहे. असे असताना वाहतूक भाडे हे अत्यंत कमी देण्यात येत आहे यामुळे वाहनांचे मासीक ईएमआई भरणे ही शक्य होत नाही.
स्थानिक चालकांना रोजगार मिळत नसल्यामुळे त्यांच्या कुटूंबावर उपासमारीचे संकट निर्माण झालेले आहे.
वाहतुकीचे भाडे वाढविण्यात यावे. पल्ला गाड्यांचे कामे काढून हायवा वाहनाला दिले ते परत पल्ला वाहनाला देण्यात यावे.स्थानिक चालक मालकांना रोजगार देण्यात यावे.बाहेरील लोकांना रोजगार देण्यात येऊ नये .माती उत्खनन कंपन्या मध्ये स्थानिक युवकांना रोजगार देण्यात यावा या मागण्याचे निवेदन दिनांक 18 ऑगस्ट रोजी घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू रेड्डी, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सरफराज पटेल, अससू भाई, अनिल वर्मा, सलीम शेख, अनिस अहमद, विशाल मादर यांच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर- वणी-आर्णी क्षेत्राचे खासदार श्री.बाळू धानोरकर यांना देऊन खाणीत भेट देऊन स्थानिकांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली.