चंद्रपूर:
चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त मराठी पत्रकार भवनाच्या प्रांगणात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण समारंभ मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.बंडूभाऊ लडके यांचे शुभ हस्ते करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कांग्रेस नेते विनायकराव बांगडे उपस्थित होते.
बंडूभाऊ लडके यांनी कोरोना आजारावर मात करण्यासाठी सैनिटाइजर, मास्क व सुरक्षित अंतर ठेवत नियमाचे पालन करावे अशी सर्व पत्रकारांना विनंती केली तसेच सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संचालन ज्ञानदेव जुनघरे यांनी केले.
याप्रसंगी परिषद प्रतिनिधी बबन बांगडे,मुरलीमनोहर व्यास,सरचिटणीस सुनिल तिवारी,शोभा जुनघरे,अंबिकाप्रसाद दवे, नामदेव वासेकर,विजय लडके, रवि नागपुरे, रमेश जयस्वाल,राजु झाडे, छत्रपती खोब्रागडे, हेमंत रुद्रपवार,जयंत पाडवार उपस्थित होते.सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवून झेंडावंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.