चंद्रपूर : लॉयड मेटलच्या व्यवस्थापनाकडून कोरोनाच्या लॉकडाऊनपासून कामगारविरोधी धोरण राबविले जात असल्याने कामगारवर्गात असंतोष फोफावला आहे. कामगारांनी कारखान्याच्या गेटसमोर आंदोलन सुरु केले. कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्याकरिता खासदार बाळू धानोरकर यांनी पुढाकार घेत कामगारांना महिन्याला २१ दिवस काम देण्याची प्रमुख मागणी मान्य केली. यामुळे ४५ तासाचे आंदोलन संपल्यामुळे कामगारांत आनंद दिसून येत आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात कामगारांना पुरेशे वेतन दिले नाही. मागील महिन्यापासून कारखान्याचे उत्पन्न पूर्ववत सुरु झाले असताना कामगारांना केवळ १५ दिवसांचे काम देण्यात येत होते. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्या अनेक मागण्यासाठी आज चंद्रपूर शासकीय विश्राम गृह येथे कारखान्याचे अधिकारी प्रशांत पुरी, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, लॉयड मेटल कामगार अध्यक्ष दिनेश चोखारे, चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रामू तिवारी, लॉयड मेटल कामगार कार्याध्यक्ष रोशन पचारे, लॉयड मेटल कामगार कार्याध्यक्ष पवन अगदारी, सोहेल शेख यांची उपस्थिती होती. या बैठकीत कामगारांचे अनेक मागण्या कारखाना व्यवस्थापना पुढे ठेवण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने कामगारांना महिन्याला २१ दिवस काम देण्याची प्रमुख मागणी मान्य झाली. ह्या मागण्या पूर्ण करत येत्या काही दिवसात अन्य मागण्या देखील पूर्ण करण्यात येईल असे कारखान्याचे व्यवस्थापक प्रशांत पुरी यांनी सांगितले. यावर कामगारांनी देखील समाधान मानत आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले.
. . . . . . . . .. . . . . .
कामगारावर अन्याय झाल्यास खपवून घेणार नाही : खासदार बाळू धानोरकर
कंपनी करीता येथील स्थानिकांनी आपल्या पूर्वजांच्या जमिनी दिल्या. त्यामुळे हा कारखाना उभा राहिला. कोरोना मुळे सर्वत्र संकट आहे. या कामगाराच्या कुटुंबावर देखील आर्थिक शकत कोसळलेला आहे.आजवर यांच्यामुळेच हा कारखाना मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती करीत आहे. परंतु आता मात्र कामगारावर अन्याय झाल्यास खपवून घेणार नाही असा इशारा कारखाना व्यवस्थापनाला खासदार बाळू धानोरकर यांनी दिला.