मंगळवारी मुख्य कार्यक्रम, माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांची प्रमुख उपस्थिती
चंद्रपूर : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, प्रख्यात उद्योगपती, दानशूर समाजसेवक स्व. छोटूभाई गोपालभाई पटेल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या १३ सप्टेंबरला प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात मुख्य कार्यक्रम होणार असून, माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्लभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पटेल परिवार आणि छोटूभाई पटेल हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूरच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
मंगळवारी दुपारी १२ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्लभाई पटेल, उद्घाटक म्हणून माजी खासदार नरेश पुगलिया, तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध समाजसेविका तथे मनोहरभाई पटेल अकादमी व गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष वर्षाबेन प्रफुल्लभाई पटेल, खासदार बाळू धानोरकर, माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर, माजी पालकमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, ज्येष्ठ पत्रकार सत्यनारायणजी तिवारी, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पटेल परिवार आणि छोटूभाई पटेल हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.