चंद्रपूर जिल्ह्यात बालविवाह करून देणा-यावर गुन्हा दाखल

चंद्रपूर, दि. 20,   कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथे अल्पवयीन बालिकेचा बालविवाह १८ फेब्रुवारी २०२१ रोजी होत असल्याची गोपनीय माहिती पद्धतीने चाईल्ड हेल्प लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर मिळाली असता महिला बाल विकास कार्यालय यांच्या चमूने या ठिकाणी धाड टाकून गडचांदूर पोलीस स्टेशन येथे बालविवाहाची तक्रार नोंदिविली. पोलीसांनी बालविवाहासाठी संबंधित असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून  केसचा पुढील तपास निरीक्षक अधिकारी प्रमोद शिंदे करत आहे.
सदर प्रकरणात जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश टेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाईल्ड लाईन चंद्रपूर समन्वयक अमोल मोरे, रेखा घोगरे व कल्पना फुलझेले यांनी सहकार्य केले.
नागरिकांनी बालविवाहा बाबत माहिती मिळाल्यास चाइल्ड लाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष ८४१२०१६२४८ व ७९७२८४९९७४ तसेच तसेच गावातील ग्रामसेवक, अंगणवाडी शिक्षिका, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) पंचायत समिती अथवा जवळील पोलीस स्टेशन येथे कळवावे. तक्रार देणाऱ्याची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here