मुंबई,21 जानेवारी:महाराष्ट्रामध्ये यंदा 12वी म्हणजेच एचएससी ची परीक्षा 23 एप्रिल तर 10वी म्हणजेच एसएससीची परीक्षा 29 एप्रिल पासून घेतली जाणार आहे अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. दरम्यान वर्षा गायकवाड यांनी याबाबतचे ट्वीट करत दहावी, बारावीच्या वेळापत्रकाबददल शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात यंदा 12 ची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे या काळात पार पडेल तर 10 वीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे या महिन्याभराच्या कालावधी मध्ये पार पडणार आहे.
दहावी बारावीच्या परीक्षांसोबतच त्यांनी यंदाच्या निकालाच्या तारखेचा अंदाजही जाहीर केला आहे. 10वीचा निकाल ऑगस्ट महिन्यात तर 12 वीचा निकाल जुलै अखेरीपर्यंत जाहीर करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.