चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
चंद्रपूर, 3ऑक्टोबर:2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती च्या दिवशी समीर एम केने नामक व्यक्तीने भारतीय नोटांवर छापल्या जाणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यांच्या फोटो ला व्यंगचित्र संबोधणारी पोस्ट सोशल मिडिया वर पोस्ट केली. ही केलेली पोस्ट भारतीयांची मने दुखवणारी असल्यामुळे समीर केने ह्यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात यावा ह्या करीता दुर्गापूर पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर च्या वतीने तक्रार करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस चे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, महिला शहर अध्यक्ष ज्योती ताई रंगारी, सोशल मीडिया अध्यक्ष नितीन पिंपलशेंडे, किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल कुरेशी, शहर सचिव संजय खेवले, प्रभाग अध्यक्ष मुन्ना तेमबुरकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.