चंद्रपूर:3 सप्टेंबर
चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील काही पोलिस कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय तीन दिवसांकरिता बंद करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय,महानगरपालिका,जिल्हा परिषद व जिल्हा कारागृह नंतर आता थेट पोलिस खात्यातील सर्वेसर्वा असलेले जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या कार्यालयात कोरोना नी दस्तक दिल्याने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.विश्वसनीय सुत्रांकडून प्राप्त महितीनुसार पोलिस अधीक्षक कार्यालय 3 दिवसांकरिता बंद करण्यात आले असून कोणालाही आत जाण्याची परवानगी नसणार आहे.संपूर्ण कार्यालय व कार्यालय परिसर सैनिटाइज करण्याचे काम सुरु झाले आहे.