मायनिंग सरदार व ओव्हरमेन च्या रिक्त जागा तात्काळ भरा – आ.किशोर जोरगेवार

चंद्रपूर:24 ऑगस्ट

मागील तीन वर्षापासून वेकोलीच्या नागपूर विभागाच्या वतीने मायनिंग सरदार व ओव्हरमेंन या पदाच्या जागा काढण्यात आलेल्या नाही. त्यामूळे हे पदे रिक्त असून मायनिंग सरदार व ओव्हरमेंनचे महागडे शिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामूळे वेकोली प्रशासनाच्या वतीने तात्काळ सदर पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणीचे पत्र त्यांनी वेकोलीच्या मुख्य व्यवस्थापीक संचालक नागपूर, यांना पाठविले आहे.

नागपूर वेकोली विभागात अनेक कोळशाच्या खाणी असुन सुद्धा या ठिकाणी अपेक्षित असा रोजगार स्थानिक युवकांना उपलब्ध झालेला नाही. जिल्ह्यातील अनेक कोळश्याच्या खाणी बंद पडल्या आहेत. त्यामुळे इथे काम करणाऱ्या युवकांचा रोजगार बुडाला आहे. अश्यातच वेकोली प्रशासनाकडून २०१८ पासून मायनिंग मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. परिणामी मायनिंग अभ्यासक्रमामध्ये पास झालेले हजारो युवक अदयापही नौकरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामध्ये त्यांची वयोमर्यादा वाढत चालली आहे. उत्तीर्ण असून सूध्दा भरती प्रक्रिये अभावी नौकरीपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे. हि बाब लक्षात घेता २०१८ पासून प्रंलबीत असलेली माईनिंग विभागाचे रिक्त पदे वेकोलीतर्फे भरण्यात यावीत, ६ महिण्याच्या आत ही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, वयोमर्यादा निघालेल्या विदयार्थ्यांकरीता नौकरीची वयोमर्यादा वाढवण्यात यावी, आदि मागण्या आमदार किशोर जोरगेवार यांनी पाठविलेल्या पत्रातून वेकोलीच्या मुख्य व्यवस्थापीक संचालक नागपूर यांना केल्या आहेत. विशेष म्हणजे २०१६ ला आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर वेकोलिच्या वतीने मायनिंग सरदार व ओव्हरमेंन च्या रिक्त जागा भरण्यात आल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here