चंद्रपूर, दि. 21 ऑगस्ट : चंद्रपूरात आज ३२ वर्षीय डॉक्टराची कोरोनामुळे मृत्युची बातमी समोर येताच जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.७ ऑगस्टला या डॉक्टरचा अहवाल पॉजिटिव्ह आला होता.जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 1306 झाली आहे. गेल्या 24 तासात 57 नवीन बाधित पुढे आले आहेत .जिल्ह्यात आत्तापर्यंत 866 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात चाचण्या जिल्ह्यांमध्ये सुरू असून नागरिकांनी पुढे येऊन स्वतःच्या चाचण्या करून घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाने केले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 428 बाधित उपचार घेत आहे. आतापर्यंत 866 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 10 सह एकूण 12 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. नागरिकांनी परस्परांच्या संपर्कात न येता मास्क वापरावा, शारीरिक अंतर राखावे असे आवाहन करण्यात आले आहे.