ज्येष्ठ व्हॉलीबॉल बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर तर्फे मास्कचे वितरण

चंद्रपूर:चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार आता वेगाने होत आहे.कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या वर पोहोचलेली आहे .ऑगस्ट महिन्यात दररोज ३० ते ३५ कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून कोरोना रुग्णांची संख्या १०७० झाली आहे.आतापर्यंत ६७० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून ३९० रुग्णांवर चंद्रपूर येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहे .

७४ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ व्हॉलीबॉल बहुद्देशीय संस्था,चंद्रपूर मार्फत १५ ऑगस्ट २०२० रोजी नागरिकांना कोरोनापासून बचावासाठी मास्कचे वितरण करण्यात आले.जेष्ठ व्हॉलीबॉल बहुउद्देशीय संस्था वेळोवेळी अनेक सामाजिक कार्य चंद्रपूरमध्ये करत आली आहे.
अशातच १५ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ व्हॉलीबॉल बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर तर्फे रामनगर चौक येथे मास्क वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपलाही छोटासा वाटा असावा,यासाठी हा उपक्रम राबवीत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री प्रदिप जाणवे, सचिव श्री दीपक जेऊरकर, कोषाध्यक्ष रामस्वामी कापरबोईना, उपाध्यक्ष श्री श्यामकांत थेरे, सहसचिव श्री संदीप ठोबंळे, सदस्य नरेंद्र कुंभार ,सिद्धार्थ वाघमारे ,अरुण येरावार, प्रवीण गुज्जनवार, परविंदरसिंह ऊपल, प्रकाश सुर्वे, संतोष बोरकर, कमलाकर जोगी,अमित दिकोंडावार, सुनील कायकर,रवींद्र पुराणकर, परसराम अग्रवाल उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here