आज जिल्हा पोलीस अधीक्षक साधतील नागरिकांशी संवाद

चंद्रपूर, दि.21 जुलै: कोरोना जनजागृतीसाठी आत्मभान अभियान जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. या आत्मभान अभियानांतर्गत आकाशवाणी केंद्रावर फोन-इन कार्यक्रम  सुरू झालेला आहे. 25 जुलै शनिवार रोजी प्रसारित होणाऱ्या कोरोना आणि कायदा व सुव्यवस्था या विषयावर 22 जुलै रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जनजागृती संदर्भात नवनवीन उपक्रम राबवित आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कशी आहे, कोरोना लढाईच्या काळातील पोलीस प्रशासनाची भूमिका, जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणारी नाका-बंदी,   इत्यादी विषयी  अनेक  प्रश्न आपल्या मनात असतील तर आपण थेट फोन करून हे प्रश्न विचारू शकता.

या फोन-इन कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण दिनांक 22 जुलै बुधवार रोजी  होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सकाळी 11:30 ते 12 या  वेळेत जास्तीत जास्त 07172-254634 या संपर्क क्रमांकावर संपर्क करून आपल्या मनातील प्रश्न विचारू शकता.

नागरिकांच्या प्रश्नांच, शंकांच निरसन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी करणार आहेत.तेव्हा अवश्य फोन करा आणि जास्तीत जास्त नागरिकांनी फोन-इन या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here