गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप!

धनोजे कुणबी समाज मंडळाद्वारे सत्कार सोहळा

चंद्रपूर : समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, विविध क्षेत्रातील माहिती व्हावी, तळागाळातील समाजबांधवांनी समाजामध्येच नाही तर देशामध्ये नाव कमवावे या उद्देशाने येथील धनोजे कुणबी समाज मंदिर चंद्रपूरतर्फे गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या गुणवंतांचा यावेळी सत्कार करून त्यांची पाठ शाब्बासकीने थोपटण्यात आली. समाजातून झालेल्या सत्कारामुळे गुणवंत भारावले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज मंडळाचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम सातपुते होते. उद्‌घाटन चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले. यावेळी मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र शासन वित्त व लेखाधिकारी व ज्ञानज्‍योती एज्‍युकेशन पूणेचे संस्‍थापक डॉ. विशाल भेदूरकर, प्रमुख अतिथी म्‍हणून विमाशिचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, नायब तहसीलदार राजू धांडे, जिल्‍हा बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर, डॉ. सुरेश महाकुलकर, सर्च फाउंडेशनचे  दिलीप झाडे, अतुल देऊळकर, पांडूरंग टोंगे, डॉ. प्रभाताई वासाडे, सुनिता लोढीया, महेश खंगार, विनोद पिंपळशेंडे आदींची उपस्‍थिती होती. सत्कार कार्यक्रमाप्रसंगी यशाची गुरुकिल्ली करिअर मार्गदर्शक पुरवणीचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ॲड. पुरुषोत्तम सातपुते, डॉ. अशोक जीवतोडे, सुधाकर अडबाले यांनी मार्गदर्शन केले.
समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह कोरोना काळात उत्कृष्ठ सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा कोरोनायोद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. सचिन धगडी, डॉ. सौरभ राजूरकर, डॉ. विनोद मुसळे, डॉ. आशीष पोडे, डॉ. अमीत ढवस यांच्यासह ब्रिटिश सरकारची चेव्हनिंग स्कॉलरशिप मिळवणारे ॲड. दीपक चटप, आचार्य पदवी प्राप्त प्रा. डॉ. प्रविण भास्कर चटप, डोनेट कार्डचे सारंग बोबडे, मिस डीसी इंडिया पुरस्कार प्राप्त गायत्री सूर्यभान उरकुडे, हितेश गोहोकार, साईनाथ कुचनकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्‍ताविक प्रा. अनिल डहाके, संचालन व आभार प्रा. नामदेव मोरे यांनी केले. कार्यक्रमासाठी अरुण मालेकर, ॲड. विलास माथनकर, नामदेव मोरे, विजय मुसळे, अण्णाजी जोगी, सविता कोट्टी, गणपत हिंगाने, वासुदेव बोबडे, वसंत वडस्कर, सतीश मालेकर, भाऊराव निखाडे, लक्ष्मीकांत धानोरकर, संतोष देरकर, सतीश निब्रड, कौशिक माथनकर आदींनी परिश्रम घेतले.

आवडीचे क्षेत्र निवडा ः डॉ. विशाल भेदूरकर
विद्यार्थ्यांनो, आपल्याला करिअरसाठी क्षेत्र निवडताना कुणीतरी सांगितले म्हणून निवडले, असे न करता इच्छा असेल तेच क्षेत्र निवडा. करिअरसाठी विविध क्षेत्र आहे. आवडीचे क्षेत्र निवडताना प्रथम ज्या क्षेत्रात आपल्याला जायचे आहे, त्याचा अभ्यास करा. त्यातील बारकावे शोधा. त्यातील रोजगाराच्या संधी शोधा त्यानंतरच क्षेत्र निवडा. पालकांना आपल्या भविष्याची चिंता असते. त्यामुळे विचारपूर्वक क्षेत्र निवडण्याचा सल्ला यावेळी महाराष्ट्र शासन वित्त व लेखाधिकारी व ज्ञानज्‍योती एज्‍युकेशन पूणेचे संस्‍थापक डॉ. विशाल भेदूरकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here