नागपूर दि. १८ : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज नागपूर येथे रात्री साडेआठच्या सुमारास आगमन झाले. श्री. फडणवीस उद्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करतील.
नागपूर विमानतळावर उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी , नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार,जिल्हाधिकारी आर. विमला, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. आमदार कृष्णा खोपडे यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस उद्या वर्धा आणि चंद्रपुर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर नागपूर येथे यासंदर्भात विभागस्तरीय आढावा बैठक घेतील.