चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहेत. या भागात अद्यापही रोड व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येते. मागील पाच वर्षात फक्त सत्तेवर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्राचा विकास केला. शहरातील दुर्लक्षित भाग विकासापासून कोसो दूर असून येत्या काळात चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकास हेच ध्येय असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
आज चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प प्रभागातील ५२ लक्ष, आणि इंडस्ट्रीयल प्रभाग क्र. ६ येथे २५ लक्ष रुपयांचे सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन समारोह पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष संगीता अमृतकर, ग्रामीण महिला काँग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमस्कर, माजी नगरसेविका संगीता भोयर, माजी नगरसेवक राजेश अडूर, माजी नगरसेविका सुनीता लोढीया, प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, काँग्रेस नेते शिवा राव, माजी नगरसेवक मनोरंजन रॉय, अमजद अली, शालिनी भगत, दौलत चालखुरे, नौशाद शेख, राज यादव, सुलतान अली, राजू भाई, पप्पू सिद्धीकी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, चंद्रपूर शहराच्या विकासाकरिता आजवर मोठ्या प्रमाणात निधी आला. परंतु नियोजन शून्य कामामुळे चंद्रपूरच्या सर्वांगीण विकास करणे शक्य झाले नाही. परंतु येत्या काळात चंद्रपूरच्या सर्वांगीण विकास करू असे मत त्यांनी व्यक्त केले.