‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम
चंद्रपूर : इनरव्हील चांदा फोर्ट एंजल्सच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून डॉक्टरांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टरांना देवाचे स्थान दिले जाते. त्यामुळे या डॉक्टरांप्रती आदरभाव व्यक्त करण्याच्या उद्देशातून कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी डॉ. आशीष व्यास, डॉ. रुजुता मुंधडा, डॉ. शीतल कापरतीवार, नितीशा चावडा, डॉ. हरलिन भाटिया, डॉ. प्रदन्या चिल्लरवार, डॉ. गोपीचंद वाराडकर, डॉ. कुणाल कापरतीवार, डॉ. शेवता कुलकर्णी, सीए भूमिका खोसला
यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला इनरव्हील एंजल्सच्या अध्यक्षा अपेक्षा धवल राजा, सचिव कृतिका नथवानी, सिसी सुरभी रामगिरवार, माजी अध्यक्ष मुग्धा जगशेट्टीवार, प्रतीक्षा उपगन्लावार, पूनम पटेल रोडे यांची उपस्थिती होती.