जागतिक पर्यावरण दिनी सुपर रायडर सायकल ग्रुप तर्फे वृक्षारोपण

चंद्रपूर:5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुपर रायडर क्लब चांदा च्या वतीने सिटीपीएस ते तिरवंजा रोड वरील मोकळ्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले.
यानिमित्त प्रत्येकांनी स्वतः सह नातेवाईक मंडळी व मित्रमंडळींच्या वाढदिवसानिमित्य वृक्षारोपण करण्याचा व त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. या सायकल क्लबचे सदस्य प्रसंगोपात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. नुकतेच शिवरात्री च्या निमित्याने घंटाचौकी प्राचीन शिवमंदिर येथे स्वच्छता अभियान सुद्धा राबवण्यात आले होते.
सायकल क्लब चे सदस्य हरीश ससनकर, मुकेश मस्के, प्रमोद कोरडे पंकज उद्धरवार, नितीन रोडगे, चंदन बोधे हे या वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here