मुंबई दि. 21: चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
अजयपूर गावाजवळ गुरुवारी रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघातानंतर मोठी आग लागून ट्रकमधील नऊ मजुरांचा भाजून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून आर्थिक मदत जाहीर केली आहे.अपघातात घरचा कर्ता गमावल्याने सदर कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले होते. त्यामूळे सदर कुटंबांचा सहानभूती पुर्वक विचार करुन त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची शुक्रवारी मुबंई येथील वर्षा निवासस्थावर भेट घेउन केली होती. या मागणीची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 12 तासाच्या आत दखल घेत सदर मृतक कुटुंबियांना 5 लक्ष रुपयांची मदत जाहिर केली आहे. याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानले आहे.