चंद्रपूर:पॉवर लिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत येथील वर्षा बंडू रामटेके विजेत्या ठरल्याअसून, त्यांना ‘सुपर स्ट्रांग वूमन ऑफ इंडिया’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.वर्षा रामटेके यांना हा पुरस्कार सलग तिसऱ्यांदा मिळाला आहे. यापूर्वी हरियाणातील सोनिपत, रायपूर व नागपूर येथे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
नुकताच त्यांना 9 मार्च रोजी चंद्रपूर जिल्हा स्पर्धेत ‘स्ट्रांग वुमन ऑफ चंद्रपूर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.दिनांक 6,7,8 एप्रिल रोजी नागपूर येथील अग्रसेन भवन येथे पार पडलेल्या स्पर्धेतही उत्कृष्ट प्रदर्शन करून यशस्वी कामगिरी बजावली आहे. नागपूर येथे त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे.