कार्यालयात जातांना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 31 जानेवारी : जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांच्या अपघाताचे प्रमाण वाढत असुन मृत्युमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा-1988 चे कलम 129 अन्वये सक्तीचे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सन 2021 मध्ये दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हयातील महामार्गावर तुर्तास हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. शहरात तसेच महामार्गावर पोलिस अंमलदार तसेच इतर शासकीय अधिकारी,कर्मचारी विना हेल्मेट दुचाकी, चालवितांना आढळून येत आहेत. दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करण्याची शिस्त लागावी, याकरीता दि. 1 जानेवारी 2022 रोजी सर्वप्रथम पोलिस अंमलदार यांच्या विरुध्द कार्यवाही करण्यात आली व त्यानंतर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुध्द कार्यवाही करण्यात येणार आहे.
सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस अंमलदार यांनी आपल्या कार्यालयात जातांना हेल्मेट परिधान करावे. जे कर्मचारी विना हेल्मेट दुचाकी चालवितांना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, यांची नोंद घ्यावी. दुचाकी चालवितांना सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हेल्मेट परिधान करावे, असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांनी केले आहे