चंद्रपूर:दैनिक “हितवाद” या दैनिकाचे माजी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी व नाट्यदिग्दर्शक श्री सुनील देशपांडे यांच्या पत्नी, नाट्यकर्मी सौ. सविता देशपांडे यांचे आज रात्री 8.15 ला नागपूर येथे निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय 57 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा, एक मुलगी ,जावई, स्नुषा, नात आणि मोठा आप्त परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार दिनांक 31/12/2021 ला त्यांचे 201,घनश्याम लक्ष्मी अपार्टमेंट, मनीषनगर रोड, सोमलवाडा, नागपूर या निवासस्थानाहून निघेल. ईश्वर मृतात्म्यास शांती प्रदान करो आणि देशपांडे कुटुंबियांना या धक्क्यातून सावरण्याचे बळ देवो हीच सा. चंद्रपूर एक्सप्रेस व तिवारी परिवारातर्फे प्रार्थना.