चंद्रपूर दि. 15 नोव्हेंबर: 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी मतदान नोंदणी करावी या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाकडून वोटर हेल्पलाइन ॲप विकसित करण्यात आला आहे. हा वोटर हेल्पलाइन ॲप नागरिक व मतदारांनी त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करुन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
हा ॲप डाऊनलोड करण्यासाठी, गुगल प्ले-स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध आहे. वोटर हेल्पलाइन ॲपमध्ये मतदार यादीमध्ये नाव शोधणे, मतदार यादीमध्ये नवीन नोंदणी करणे, नमुना-6, नाव वगळणी करण्यासाठी नमुना-7, दुरुस्ती करावयाची असल्यास नमुना-8, नाव स्थलांतरीत करणे नमुना 8-अ, तक्रार दाखल करणे व तक्रारी संबंधी स्टेटस तपासणे, तसेच निवडणुकीचे निकाल वोटर हेल्पलाइन ॲपवर बघता येतील, EPIC डाऊनलोड करता येईल. आदी सुविधा वोटर हेल्पलाईन अॅपमध्ये उपलब्ध आहेत. त्यासोबतच नागरीकांना मतदार नोंदणी संबंधाने काही तक्रार असल्यास मतदार टोल फ्री, हेल्पलाईन क्रमांक 1950 या संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकतात.
तरी वोटर हेल्पलाईन ॲपचा जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिक व मतदारांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.